गणेश जी की संपूर्ण आरती :
सुख कर्ता दुःख कर्ता , शेंदुर लाल चढायो,दुर्गे दुर्घट भारी,लवथवती विक्राळा ,कर्पूरगौरं , घालीन लोटांगण
श्री गणेश आरती – सुख कर्ता दुःख कर्ता आरती
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची |
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर उटी शेंदूराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळाची ।।
जय देव जय देव जय मंगल मूर्ती ।
दर्शनमात्रे मन कामनापुर्ती ।।जय देव
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा |
हीरे जडित मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया ।।जय देव
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्रतुण्ड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे
सुरवरवंदना ।। जय देव
– समर्थ रामदासस्वामी
श्री गणेश आरती – शेंदुर लाल चढायो
शेंदुर लाल चढायो अच्छा गजमुखको ।
दोंदिल लाल बिराजे सुत गौरिहरको ।
हाथ लिये गुडलद्दु सांई सुरवरको ।
महिमा कहे न जाय लागत हूं पदको ।। १ ।।
जय जय जी गणराज विद्या सुखदाता ।
धन्य तुम्हार दर्शन् मेरा मन रमता ।। धृ ।।
अष्टौ सिद्धी दासी संकटको बैरि ।
विघ्नविनाशन मंगल मूरत अधिकारी ।
कोटीसूरजप्रकाश ऐसी छबि तेरी ।
गंडस्थलमदमस्तक झूले शशिबिहारि ।। २ ।।
भावभगतसे कोई शरणागत आवे ।
संतत संपत सबही भरपूर पावे ।
ऐसे तुम महाराज मोको अति भावे ।
गोसावीनंदन निशिदिन गुन गावे ।। ३ ।।
-गोसाविनंदन
श्री देवीची आरती – दुर्गे दुर्घट भारी
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारीं जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥
जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥
त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥
साही विवाद करितां पडिले प्रवाही ।
ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥ २ ॥
प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां ।
क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा ।
नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥ ३ ॥
शंकराची आरती – लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥
कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २ ॥
देवीं दैत्य सागरमंथन पै केलें ।
त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ जय देव ॥ ३ ॥
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ॥ जय देव जय देव ॥ ४ ॥
कर्पूरगौरं करुणावतारं
कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम्
सदावसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि
मन्दारमाला कुलतालकायै कपालमालांकित शेखराय
दिव्याम्बरायै च दिगंबराय नम: शिवायै च नम: शिवाय ॥
घालीन लोटांगण वंदीन चरण
घालीन लोटांगण वंदीन चरण ।
डोळ्यांनी पाहिन रूप तुझे ।
प्रेमें आलिंगीन आनंद पूजन ।
भावे ओवाळिन म्हणे नामा ।।1।।
त्वमेव माता पिता त्वमेव ।
त्वमेव बन्धु: सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्वं मम देवदेव ।।2।।
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा ।
बुध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् ।
करमि यद्यत् सकलं परस्मै ।
नारायणायेती समर्पयामि ।।3।।
अच्युतं केशवं राम नारायणम्
कृष्णदामोदरं वासुदेवं भजे।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभम्
जानकीनायकं रामचंद्र भजे ।।4।।
हरे राम हरे राम राम राम हरे हरे
हरे कृष्ण हरे कृष्ण कृ्ष्ण कृ्ष्ण हरे हरे ।।
।। मंगलमुर्ती मोरया ।।
।। गणपतिबाप्पा मोरया ।।
गणेश जी की संपूर्ण आरती PDF
इसे भी पढ़े
- गणेश पूजन सामग्री लिस्ट : आवश्यक सामग्री की संपूर्ण सूची
- गणेश प्रार्थना मंत्र : महत्व, उच्चारण और लाभ
- श्री गणेश पंचरत्नम
- भगवान गणेश जी की पुष्पांजलि मंत्र
- शक्तिशाली गणेश मंत्र
- श्री गणेश चालीसा
- श्री गणेश आरती (जय गणेश, जय गणेश देवा)
- श्री गणेश के 108 नाम मंत्र सहित (Pdf)