गणपती आरती संग्रह मराठी | Ganpati Arati Sangrah PDF

गणपती आरती संग्रह हा मराठी भाषेत भक्तांच्या ह्रदयाला अत्यंत प्रिय आहे. महाराष्ट्रात आणि इतर भागांमध्ये गणपती बाप्पाची पूजा विशेषत: मोठ्या उत्साहाने केली जाते, आणि आरत्या हा त्या पूजेचा अविभाज्य भाग आहे. गणेश चतुर्थीच्या काळात, घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये या आरत्या मोठ्या भक्तिभावाने गायल्या जातात.

गणपती आरती संग्रहात गणेशाची महती, त्याच्या शक्ती, आणि कृपांचा उल्लेख आहे. या आरत्यांच्या माध्यमातून भक्त गणपती बाप्पाला विनंती करतात की तो त्यांच्या जीवनातील विघ्न दूर करावा आणि सुख-समृद्धी देणारा मार्ग दाखवावा.

इसे भी पढ़े

या संग्रहात प्रमुख आरत्या समाविष्ट आहेत जशा की:

मराठी गणपती आरती संग्रह

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळाची ॥०१॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ।
रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
हिरे जडित मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया ॥०२॥

लंबोदर पितांबर फनी वरवंदना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना ।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥०३॥

तू सुखकर्ता तू दुःखहर्ता विघ्‍न विनाशक मोरया

तू सुखकर्ता तू दुःखहर्ता विघ्‍न विनाशक मोरया ।
संकटी रक्षी शरण तुला मी, गणपती बाप्पा मोरया ॥०१॥

मंगलमूर्ती तू गणनायक, वक्रतुंड तू सिद्धिविनायक ।
तुझिया द्वारी आज पातलो, ये इच्छित मज द्याया ॥०२॥

तू सकलांचा भाग्य विधाता, तू विद्येचा स्वामी दाता ।
ज्ञानदीप उजळून आमुचा निमवी नैराश्याला ॥०३॥

तू माता तू पिता जगी या, ज्ञाता तू सर्वस्व जगी या ।
पामर मी, स्वर उणे भासती तुझी आरती गाया ॥०४॥

मंगलमूर्ति मोरया । गणपतीबाप्पा मोरयो ॥

गजानना श्रीगणराया आधी वंदू तुज मोरया

गजानना श्रीगणराया ।
आधी वंदू तुज मोरया ॥
मंगलमूर्ती श्री गणराया ।
आधी वंदू तुज मोरया ॥०१॥

सिंदुर-चर्चित धवळे अंग ।
चंदन उटी खुलवी रंग ।
बघतां मानस होतें दंग ।
जीव जडला चरणी तुझिया ।
आधी वंदू तुज मोरया ॥०२॥
गजानना श्रीगणराया ।
आधी वंदू तुज मोरया ॥

गौरीतनया भालचंद्रा ।
देवा कृपेच्या तूं समुद्रा ।
वरदविनायक करुणागारा ।
अवघी विघ्नें नेसी विलया ।
आधी वंदू तुज मोरया ॥०३॥
गजानना श्रीगणराया ।
आधी वंदू तुज मोरया ॥

बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे

गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया ।
तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता ।
अवघ्या दीनांच्या नाथा ।
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे ।
चरणी ठेवितो माथा ॥०१॥

पहा झाले पुरे एक वर्ष ।
होतो वर्षानं एकदा हर्ष ।
गोड अन्नाचा होतो रे स्पर्श ।
घ्यावा संसाराचा परामर्ष ।
पुऱ्या वर्षाची, साऱ्या दुःखाची ।
वाचावी कशी मी गाथा ॥०२॥

आली कशी पहा आज वेळ ।
कसा खर्चाचा बसावा मेळ ।
गूळ-फुटाणे खोबरं नि केळं ।
साऱ्या प्रसादाची केली भेळ ।
कर भक्षण आणि रक्षण ।
तूच पिता तूच माता ॥०३॥

नाव काढू नको तांदुळाचे ।
केले मोदक लाल गव्हाचे ।
हाल ओळख साऱ्या घराचे ।
दिन येतील का रे सुखाचे ।
देवा जाणुनि गोड मानुनि ।
द्यावा आशीर्वाद आता ॥०४॥

घालीन लोटांगण

घालीन लोटांगण वंदिन चरन ।
डोळ्यांनी पाहीं रुप तुझे ।
प्रेम आलिंगिन आनंदे पूजीं ।
भावे ओवालीन म्हणे नामा ।
त्वमेव माता पिता त्वमेव ।
त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्वम मम देव देव ।
कयें वच मनसेन्द्रियैवा ।
बुद्धयात्मना व प्रकृतिस्वभावा ।
करोमि यद्यत सकलं परस्मै ।
नारायणायेति समर्पयामि ॥०१॥

अच्युत केशवम रामनरायणं ।
कृष्णदामोदरं वासुदेवं हरी ।
श्रीधरम माधवं गोपिकावल्लभं ।
जानकीनायकं रामचंद्रम भजे ॥०२॥

हरे राम हरे राम ।
राम राम हरे हरे ।
हरे कृष्णा हरे कृष्णा ।
कृष्णा कृष्णा हरे हरे ॥०३॥

हरे राम हरे राम ।
राम राम हरे हरे ।
हरे कृष्णा हरे कृष्णा ।
कृष्णा कृष्णा हरे हरे ॥०४॥

शेंदुर लाल चढ़ायो

शेंदुर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को ।
दोंदिल लाल बिराजे सुत गौरिहर को ।
हाथ लिए गुडलद्दु सांई सुरवर को ।
महिमा कहे न जाय लागत हूं पद को ।
जय देव जय देव ॥०१॥

जय जय श्री गणराज विद्या सुखदाता ।
धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता ।
जय देव जय देव ॥०२॥

भावभगत से कोई शरणागत आवे ।
संतति संपत्ति सबहि भरपूर पावे ।
ऐसे तुम महाराज मोको अति भावे ।
गोसावीनन्दन निशिदिन गुण गावे ।
जय देव जय देव ॥०३॥

जय जय श्री गणराज विद्या सुखदाता ।
धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता ।
जय देव जय देव ॥०४॥

आरती भुवनसुंदराची

आरती भुवनसुंदराची, इंदिरावरा मुकुंदाची ।
पद्मसम पाद्यू गमरंगा ओंवाळणी होती भृंगा,नखमणी स्रवताहे गंगा ।
जे कां त्रिविधतापभंगा, वर्तुळ गुल्फ भ्राजमाने, किंकिंनीक्कणित नाद घणघाणीत ।
वाकीवर झुणित नेपुरें झनन मंदिराची, झनन ध्वनी मंदिराची ॥०१॥

पितपट हाटकतप्तवर्णी कांती नितंब सुस्थानिं, नाभिची अगाध हो करणी ।
विश्व जनकाची जे जननी, त्रिवलीललित उदरशोभा, कंबुगलभाल विलंबित झळाळ ।
कौस्तुभ सरळ बाहु श्रीवत्स तरलमणिमरळ कंकणाची प्रीती बहुजडित कंकणाची ॥०२॥

इंदुसम आस्य कुंदरदना अधरारुणार्क बिंबवदना, पाहतां भ्रांती पडे मदना ।
सजलमेघाब्धि दैत्यदमना झळकत मकरकुंडलाभा, कुटील कुंतली मयूरपत्रावली ।
वेष्टिले तिलक भालीं, केशरी झळाळीत कृष्ण कस्तुरीची ॥०३॥

कल्पद्रुमातळीं मूर्ती सौदामिनी कोटी, दीप्ती गोपिगोपावली भवतीं ।
त्रिविष्टप पुष्पवृष्टी करिती,मंजुळ मधुर मुरली नाद,चकित गंधर्व चकित अप्सरा ।
सुरागीरीवरा, कर्पूरधरा रतिनें प्रेमयुक्त साची, आरती ओवाळीत साची ॥०४॥

वृंदावनी चियें हरणी, सखे ग कृष्ण माय बहिणीं, श्रमलो भवाब्धिचे फिरनिं ।
अतां मज ठाव देई चरणी, अहा हे पुण्याश्लोका, नमितो चरण शरण मी,करुणा येऊ दे विशाळपाणी ।
कृष्ण नेणतें बाळ आपुलें राखीं लाज माझी, दयानिधे राखीं लाज माझी ॥०५॥

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारीं जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट नीवारी ॥०१॥

जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी । जय देवी जय देवी ॥

त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥
साही विवाद करितां पडिले प्रवाही ।
ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥०२॥

जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी । जय देवी जय देवी ॥

प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां ।
क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा ।
नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥०३॥

जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी । जय देवी जय देवी ॥

येई हो विठ्ठले माझे माउली ये

येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
निढळावरी कर…
निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहें ।
ठेवुनी वाट मी पाहें ॥

येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।

आलिया गेलिया हातीं धाडी निरोप ।
आलिया गेलिया हातीं धाडी निरोप ।
पंढरपुरी आहे…
पंढरपुरी आहे माझा मायबाप ।
हो माझा मायबाप, हो माझा मायबाप ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ॥०१॥

पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला ।
पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला ।
गरुडावरी बैसोनि…
गरुडावरी बैसोनि माझा कैवारी आला ।
हो माझा कैवारी आला ॥

येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ॥०२॥

विठोबाचें राज्य आम्हा नित्य दिपवाळी ।
विठोबाचें राज्य आम्हा नित्य दिपवाळी ।
विष्णुदास नामा…
विष्णुदास नामा जीवे भावें ओवाळी ।
हो जीवे भावें ओवाळी ॥

येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ॥०३॥

असो नसो भाव आम्हां तुझिया ठायां ।
असो नसो भाव आम्हां तुझिया ठायां ।
कृपादृष्टी पाहें…
कृपादृष्टी पाहें माझ्या पंढरीराया ।
हो माझ्या पंढरीराया ॥

येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ॥०४॥

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ॥
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा ।
चरणीं वाहे भीमा उद्धरी जगा ॥

जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥

तुळसीमाळा गळा कर ठेवुनि कटी ।
कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी ॥
देव सुरवर नित्य येती भेटी ।
गरुड हनुमंत पुढे उभे रहाती ॥

धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा ।
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ॥
राई-रखुमाबाई राणीया सकळा ।
ओवाळीती राजा विठोबा सावळा ॥

ओवाळू आरत्या कुरवंड्या येती ।
चंद्रभागेमाजी सोडुनिया देती ॥
दिंड्या पताका वैष्णव नाचती ।
पंढरीचा महिमा वर्णाचा किती ॥

आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमध्ये स्नाने जे करिती ॥
दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ती ।
केशवासी नामदेव भावे ओवाळीती ॥

शंकराची आरती – लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥०१॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥

कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा॥०२॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥

देवीं दैत्य सागरमंथन पै केलें ।
त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥०३॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ॥०४॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥

आरती ज्ञानराजा

आरती ज्ञानराजा
महाकैवल्यतेजा, कैवल्यतेजा
सेविती साधुसंत
मनु वेधला माझा
वेधला माझा
आरती ज्ञानराजा ॥०१॥

लोपलें ज्ञान जगीं
हित नेणती कोणी, नेणती कोणी
अवतार पांडुरंग
नाम ठेविले ज्ञानी, ठेविले ज्ञानी ॥०२॥

आरती ज्ञानराजा
महाकैवल्यतेजा
सेविती साधुसंत
मनु वेधला माझा, वेधला माझा
आरती ज्ञानराजा ॥०३॥

कनकाचे ताट करीं
उभ्या गोपिका नारी
गोपिका नारी, नारद तुंबरही
साम गायन करी, गायन करी
आरती ज्ञानराजा ॥०४॥

प्रगट गृह्य बोले
विश्व ब्रह्मचि केलें
ब्रह्मचि केलें
रामाजनार्दनीं
चरणीं मस्तक ठेविलें
आरती ज्ञानराजा ॥०५॥

आरती ज्ञानराजा
महाकैवल्यतेजा
सेविती साधुसंत
मनु वेधला माझा, वेधला माझा
आरती ज्ञानराजा ॥०६॥

मोरया मोरया मी बाळ तान्हे

मोरया मोरया मी बाळ तान्हे ।
तुझीच सेवा करु काय जाणे ।
अन्याय माझे कोट्यानुकोटी ।
मोरेश्वराबा तु घाल पोटी ॥

उंदरावर बैसोनी दुडदुड तू येसी

उंदरावर बैसोनी दुडदुड तू येसी ।
हाती मोदक लाडू घेउनियां खासी ॥

भक्तांचे संकटी धावुनिया पावशी ।
दास विनवीती तुझिया चरणांसी ॥
जय देव जय देव जय गणराया ।
सकळ देवांआधीं तूं देव माझा जय देव ॥०१॥

भाद्रपदमार्सी होसी तू भोळा ।
आरक्त पुष्पांच्या घालुनियां माळा ॥
कपाळी लावुनि कस्तुरी टिळा ।
तेने तू दिसशी सुंदर सावळा । जय देव जय देव ॥०२॥

प्रदोषाची दिवशी चंद्र श्रीपाला ।
समर्थी देव मोठा आकांत केला ॥
इंद्र येवोनी चरणी लागला ।
श्रीरामा बहुत शाप दिधला । जय देव जय देव ॥०३॥

पार्वतीच्या सूता तू ये गणनाथा ।
नेत्र शिणले तुझी वाट पाहतां ॥
किती अंत पाहसी बा विघ्नहर्ता ।
मला बुद्धी देई तू गणनाथा । जय देव जय देव ॥०४॥

नानापरिमळ दुर्वा शेंदूर शमिपत्रें

नानापरिमळ दुर्वा शेंदूर शमिपत्रें ।
लाडू मोद्क अन्ने परिपूरित पात्रें ।
ऎसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे ।
अष्टहि सिद्धी नवनिधी देसी क्षणमात्रें ॥०१॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
तुझे गुण वर्णाया मज कैची स्फ़ूर्ती ॥

तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती ।
त्यांची सकलही पापे विघ्नेंही हरती ।
वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती ।
सर्वहि पावती अंती भवसागर तरती ।
जय देव । जय देव ॥०२॥

शरणांगत सर्वस्वें भजती तव चरणी ।
कीर्ती तयांची राहे जोवर शशितरणि ।
त्रैलोक्यी ते विजयी अदभूत हे करणी ।
गोसावीनंदन रत नामस्मरणी ।
जय देव । जय देव ॥०३॥

आरती करु तुज मोरया

आरती करु तुज मोरया ।
मंगळगुणानिधी राजया ।
आरती करु तुज मोरया ॥

सिद्धीबुद्धीपती संकटनाशा ।
विघ्ननिवारण तूं जगदीशा ॥
आरती करु तुज मोरया ॥०१॥

धुंडीविनायक तू गजतुंडा ।
सिंदूरचर्चित विलसित शुंडा ॥
आरती करु तुज मोरया ॥०२॥

गोसावीनंदन तन्मय झाला ।
देवा देखोनिया तुझ शरण आला ॥
आरती करुं तुज मोरया ॥०३॥

स्थापित प्रथमारंभी तुज मंगलमूर्ती

स्थापित प्रथमारंभी तुज मंगलमूर्ती ।
विघ्ने वारुनी करिसी दीनेच्छा पुरती ॥
ब्रह्मा विष्णु महेश तीघे स्तुती करिती ।
सुरवर मुनिवर गाती तुझिया गुणकीर्ती ॥
जय देव जय देव जय गणराजा ।
आरती ओवाळू तुजला महाराजा ॥०१॥

एकदंता स्वामी हे वक्रतुंडा ।
सर्वाआधी तुझा फ़डकतसे झेंडा ॥
लप लप लप लप लप लप हालति गज शुंडा ।
गप गप मोद्क भक्षिसी घेऊनि करि उंडा ॥
जय देव जय देव जय गणराजा ।
आरती ओवाळू तुजला महाराजा ॥ ॥०२॥

शेंदूर अंगी चर्चित शोभत वेदभुजा ।
कर्णी कुंडल झळ्के दिनमनी उदय तुझा ॥
परशांकुश करि तळपे मूषक वाहन दुजा ।
नाभिकमलावरती खेळत फ़णिराजा ॥०३॥

भाळी केशरिगंधावर कस्तुरी टीळा ।
हीरेजडित कंठी मुक्ताफ़ळ माळा ॥
माणिकदास शरण तुज पार्वतिबाळा ।
प्रेमे आरती ओवाळिन वेळोवेळा ॥
जय देव जय देव जय गणराजा ।
आरती ओवाळू तुजला महाराजा ॥०४॥

कपोल झरती मदें शुण्डा बहु साजे

कपोल झरती मदें शुण्डा बहु साजे ।
शेंदुर जो घवघवीत अद्भुत सुविराजे ।
घागरियांचा घोळ पदीं घुळघुळ वाजे ।
प्रसन्नवदना देवा ध्याना सुख माजे ॥०१॥

जय देव जय देव गजनरवेषा ।
आरती ओवाळू तुजला विश्वेशा ॥

विशेष महिमा तुझा नकळे गणनाथा ।
हरिसी संकट विघ्ने तापत्रयव्यथा ।
अखण्ड आनंदे तू डोलविसी माथा ।
ताण्डनृत्य करिसी तातक् धिम ताथा ॥०२॥

जय देव जय देव गजनरवेषा ।
आरती ओवाळू तुजला विश्वेशा ॥

विद्या धनसंपदा कनकाच्या राशी ।
नारी सुत मंदिरे सर्वहि तू देशी ।
निर्वाणी पावशी वेगीं भक्तांसी ।
गोसा‍वीनंदन गातो कवितांशी ॥०३॥

जय देव जय देव गजनरवेषा ।
आरती ओवाळू तुजला विश्वेशा ॥

जय जय गणपती । ओवाळीत आरती ।

जय जय गणपती । ओवाळीत आरती ।
साजि-या सरळ भुजा । परश कमळ शोभती ॥

अवतार नाम भेद । गणा आदी अगाध जयासी पार नाही ।
पुढे खुंटला वाद । एकची दंत शोभे । मुख विक्राळ दोंद ॥
ब्रह्मांडा माजि दावी । ऐसे अनंत छंद ॥०१॥

जय जय गणपती । ओवाळीत आरती ।
साजि-या सरळ भुजा । परश कमळ शोभती ॥

हे मही ठेंगणी हो । तुज नृत्यनायका ॥
भोंवरी फेरे देता । अतुरा मर्दीले एका ॥
घाडले तोडर हो । भक्त जनपाळका ॥०२॥

जय जय गणपती । ओवाळीत आरती ।
साजि-या सरळ भुजा । परश कमळ शोभती ॥

सुंदर शोभला हो । रूपे लोपली तेजें ॥
उपमा काय देऊ । नये आणिक दुजे ॥
रवि शशि तारांगणे । जयामाजी सहजे ॥
उधरी सामावली । जया ब्रह्मांडबीजे ॥०३॥

जय जय गणपती । ओवाळीत आरती ।
साजि-या सरळ भुजा । परश कमळ शोभती ॥

वर्णिता शेष लीला । मुखे भागली त्याची ॥
पांगुळले वेद कैसे । चारी राहिले मुके ॥
अवतार जन्मला हो । लिंग नामिया मूखे ॥
अमूर्त मूर्तिमंत । होय भक्तीच्या सूखे ॥०४॥

जय जय गणपती । ओवाळीत आरती ।
साजि-या सरळ भुजा । परश कमळ शोभती ॥

विश्व हे रूप तुझे । हस्तपाद मुखडे ॥
ऐसाचि भाव देई । तया नाचतां पुढे ॥
धूप दीप पंचारती । ओवाळीन निवाडे ॥
राखें तूं शरणांगता ॥ तुका खेळतां लाडे ॥०५॥

जय जय गणपती । ओवाळीत आरती ।
साजि-या सरळ भुजा । परश कमळ शोभती ॥

जय जय गणपति अघशमना

जय जय गणपति अघशमना । करितों आरति तव चरणां ॥
छळिती षडरिपु मजला । यांतुनि तारी जगपाला ॥
हरी या विविध तापाला । दैन्यहि नेई विलयाला ॥
निशिदिनी करी मज साह्याला । विनंति ही तव पदकमला ॥
विठ्ठलसुत बहु प्रेमे विनवी तारी या दिन । दयाळा करी मजवरी करूणा ॥०१॥
जय जय गणपति अघशमना । करितों आरति तव चरणां ॥

गणपति नमिती

गणपति नमिती स्तविती सुरपति तुज भजती ॥
सकलारंभी स्मरती विघ्ने संहरती ॥
शुडामांडतमूर्ती अतर्क्य तव कीर्ती ॥
आरती कवनलागीं देई मज स्फूर्ती ॥०१॥

जय देव जय देवा सुंदरगजवदना ।
तव भजनासी प्रेमा देई सुखवदना ॥

जागृति स्वप्नी माझ्या हृदयीं त्वां राहावें ॥
दुरतर भवपाशाच्या बंधा तोडावें ॥
सिंदूरवदना सखया चरणा दावावें ।
अघोरदुर्गंतिलांगी सत्वर चुकवावें ॥०२॥

जय देव जय देवा सुंदरगजवदना ।
तव भजनासी प्रेमा देई सुखवदना ॥

न कळे अगाध महिमा श्रीवक्रतुंडा ।
अतर्क्य लीला तुझी शोभे गजशुंडा ॥
तुजविण न दिसे देवा शमविल यम पीडा ।
भक्तसंकटी येसीं धावत दुडदुडां ॥०३॥

नयनीं शिणले देवा तव भेटीकरितां ।
तापत्रय दीनाचें शमवी समर्थ ।
अना कल्पद्रुम तूची शिव सूता ।
विष्णूदासें चरणी ठेवियला माथा ॥०४॥

जय देव जय देवा सुंदरगजवदना ।
तव भजनासी प्रेमा देई सुखवदना ॥

गजवदना मन नमले

गजवदना मन नमले पाहुनियां तुजला ।
म्हणता मंगलमूर्ती संताप हरला ॥
यास्तव निश्चय चरणी भाव तो धरिला ।
व्यापुनि अवघे विश्व म्हणती तुज उरला ॥०१॥

जय देव जय देव जय संकटहर्ता ।
तुजविण नाहीं कोणी संसारी त्राता ॥

गिरिजांकी बैसुनियां स्तनपान करिसी ।
तो तू राक्षस मोठमोठें निर्दळसी ॥
उचलुनि शुंडाग्रानें त्रैलोक्य धरिसी ।
गिरिजारांगे नित्य कां रे थरथरासी ॥०२॥

जय देव जय देव जय संकटहर्ता ।
तुजविण नाहीं कोणी संसारी त्राता ॥

दास विनायक मूर्ती पाहुनियां डोळे ।
मंगलमूर्ती हृदयी राहो हें बोल ।
प्राणी जें गुण गाती ते जाणा तरले ।
आपण तरूनी आपुले पूर्वज उद्धरिले ।
जय देव जय देव ॥०३॥

गजवदना पुजुनी तुला

गजवदना पुजुनी तुला करित आरती ।
तारी मला षडरिपु हे नित्य पीडिती ॥

अतिसुंदर रत्नमाळा कंठी शोभती ।
ऋद्धिसिद्धि नायिकादी चमर वारिती ॥

इंद्रादिक सुरवरनर नित्य पूजिती ।
निशिदिन मी ध्यातो तुला गणपती ॥०१॥

भक्तकामकल्पद्रुम शारदापती ।
वर्णिती हे वेद चारी आणखी स्मृती ॥

निशिदिनी जे भजिती तुला तारी त्यांप्रती ।
वसुदेव लीन पदीं दे विभो मती ॥०२॥

ओंवाळू आरती देवा श्रीमंगलमूर्ती

ओंवाळू आरती देवा श्रीमंगलमूर्ती । देवा मंगलमूर्ती ॥
अघसंकट नासुनियां द्यावी चरणींसी मुक्ती ॥

जय देवा तूं आद्य सुरवरवंद्या गणराया ।
तुझिया स्वरूपी न सरी पावे दुसरी उपमाया ॥०१॥

शेंदुर अंगी चर्चुन कंठी मुक्तांची माळा ।
लंबोदर उंदिरवर शोभे लल्लाटी टीळा ॥०२॥

पीतांबरी परिधान पायी घुंगरध्वनि गाजे ।
दुर्वांकुर वाहिले आम्ही भक्तीचे काजें ॥०३॥

वार्षिक उत्साहाची सेवा यथाशक्ति केली ।
न्यूनाधिक तें क्षमा करूनी रक्षी माऊली ॥०४॥

महानैवेद्य घृतशर्करामिश्रित हे लाडू ।
अर्पू तुजला प्रसाद आपुल्या पात्री तो वाढूं ॥०५॥

पिता तुझा तो सांब सदाशिव ध्यातो ।
श्रीरामा हनुमंतानें त्याचे पायी धरिला सप्रेमा ॥०६॥

एकदंता गुणवंता गौरी सुखसदना

एकदंता गुणवंता गौरी सुखसदना ।
ऋद्धिसिद्धिदायक कलिकिल्मिषदहना ॥
उन्नत गंड स्रवतीं डुलती नग नाना ।
शुंडादंडे मंडित गंभिर गजवदना ॥०१॥

जय देव जय देव जय शंकरकुमारा ।
पंच आरती उजळूं सुरवर पूजा देवा तुझि करिती ॥
लाडूधर वरदका मुनिजन गुण गाता ।
कणीं कुंडले देखुनि रविशशि लपताती ॥०२॥

चरणीं नुपुरांची रूणझुणध्वनी उठली ।
घोषें दुमदुमली ॥
अदभुत पंचभूते तेथुनि उद्भवली ॥०३॥

ऐंसे वैभव तुझें नाटक नृत्याचें ।
देखुनियां लुब्धलें मन गंधर्वाचें ॥
ऐकुनि चिंतन करणें तुझिया चरणाचें ।
चिंतन करिता नासे दु:ख विश्वाचें ॥०४॥

कमलासन भयनाशन गिरिजानंदना ।
कटि सुंदर पीतांबर फणिवरभूषणा ॥
विद्यावर पदिं तोडर अमरारीमथना ।
मनरंजन रहिमंडण गणपती गुरू जाणा ॥०५॥

जय जय जी विघ्नहरा

जय जय जी विघ्नहरा आरती तुला ।
ओंवाळीन प्रेंमरसी तारी तू मला ॥

रत्नजडित हेममुकुट मस्तकावरी ।
शोभतसे पाशांकुश तुझिया करी ॥
वारूनिया विघ्नसमूह धाव झडकरी ।
राही पाही येई मम सदना ॥
अघदमना । शरण मी तुला ॥०१॥

आरती ही धरूनि करूं रूप पाहती ।
गजमुख हे अति सुंदर शोभते किती ।
गातो गुण वासुदेव वंदी गणपती ।
धावें । पावें । यावें । विघ्नहरा । भक्तवरा वंद्यसुरा ।
सुखवि तू मला ॥०२॥

जय देव जय वक्रतुंडा

जय देव जय देव जय वक्रतुंडा ।
सिंदुरमंडित विशाळ सरळ भुजदंडा ॥

प्रसन्नभाळा विमला करिं घेऊनि कमळा ।
उंदिरवाहन दोंदिल नाचासि बहुलीला ।
रूणझुण करिती घागरिया घोळा ।
सतार सुस्वर गायन शोभित अवलीला ॥०१॥
जय देव जय देव जय वक्रतुंडा ।
सिंदुरमंडित विशाळ सरळ भुजदंडा ॥

सारीगमपधनी सप्तस्वरभेदा ।
धिमिकिट धिमिकिट मृदंग वाजति गतिछंदा ॥
तातक् थैय्या करिसी आनंदा ।
ब्रह्मदिक अवलोकिती तव पदारविंदा ॥०२॥
जय देव जय देव जय वक्रतुंडा ।
सिंदुरमंडित विशाळ सरळ भुजदंडा ॥

अभयवरदा सुखदा राजिवदलनयना ।
परशांकुशलड्डूधर शोभित शुभवदना ॥
ऊर्ध्वदोंदिल उंदिर कार्तिकेश्वर रचना ।
मुक्तेश्वर चरणांबुजिं अलिपरि करी भ्रमणा ॥
जय देव जय देव जय ॥०३॥
जय देव जय देव जय वक्रतुंडा ।
सिंदुरमंडित विशाळ सरळ भुजदंडा ॥

जय देव जयजी गणराया

जय देव जय देव जयजी गणराया ।
हरिदरब्रह्मादिक ते वंदिती तव पायां ॥

त्रिपुरासुर वधु जातां शिव चिंती ।
बळिबंधन कराया वामन करी विनंती ॥
धाता सृष्टी सृजितां न चले मंदमती ।
स्मरण करितां तुझे मग झाली स्फूर्ती ॥०१॥

धरणी धरित मस्तकि शेषाला ओझें ।
जहाले तेव्हां स्मरण तो करि पै तुझे ॥
हळुवट पुष्पप्राय केलें गणराजें ।
सुकीर्तिमहिमाघोषें भुवनप्रय गाजे ॥०२॥

महिषासुरासि वधित पार्वतिही समरी ।
विजया देई म्हणुनी प्रार्थी ती गौरी ॥
गाती मुनिजन योगी सिद्धादिक सौरी ।
तुझिया वरदे जिंकित मन्मथ नरनारी ॥०३॥

पंडित रामात्मज हा कवि किंकर तुझा ।
विनवी तुजला भावें पावें निजकाजा ॥
रिद्धिसिद्धिदाता तो स्वामी माझा ।
संकट हरूनी रक्षी भक्तांची लज्जा ॥०४॥

जय श्रीगणेशा

जय श्रीगणेशा गणपती देवा, आरती मी करितो ।
मोरया आरती मी करितो ।
मोरया आरती मी करतो ।
भक्तां संकटी पावुनी सकला प्रसन्न तू होतो ॥

भाद्रपद मासी शुक्ल चतुर्थी, पार्थिव तुज करिती ।
मोरया पार्थिव तुज करिती ॥
भक्तां पावुनी अंती तयाला मोक्षाला नेसी ॥०१॥

नाना परीची द्रव्ये-पुष्पें तुजला अर्पिती ।
मोरया तुजला अर्पिती ॥
मोदक आणिक रक्ताफुलांवरी किती तुझी प्रीती ॥०२॥

भक्त रक्षणासाठी देवा, अष्टस्थानीं प्रकटशी ।
मोरया अष्टस्थानीं प्रकटशी ॥
तू मायेची फुंकर घालुनी, तयांस उद्धरशी ॥०३॥

स्थावर क्षेत्रीं पंचदेवता, तुजला प्रार्थिती ।
मोरया तुजला प्रार्थिती ॥
प्रसन्न होऊनी तू त्या स्थानी मोरेश्वर होसी ॥०४॥

थेऊर क्षेत्रीं भक्त तुझे बहु, चिंता ते करिती ।
मोरया चिंता ते करिती ॥
चिंता हरिशी म्हणूनी गणेशा, चिंतामणि म्हणती ॥०५॥

पल्लव क्षेत्री भक्त चिमुकलें, तुजला पूजिती ।
मोरया तुजला पूजिती ॥
प्रसन्न होऊनी तू त्या स्थानी, बल्लाळेश्वर होसी ॥०६॥

दत्तात्रेय सुत विनवितसे चरणी ।
मोरया विनवितेस चरणी ॥
सर्व जनाते संकटी रक्षी, हीच असे विनवणी ॥०७॥

जयजयाजी विघ्नांतक हे गजानना

जयजयाजी विघ्नांतक हे गजानना ।
पंचारति करितो तुज विश्वपालना ॥

कार्यारंभी प्रेमभरें पुजिति जे तुला ।
सकल अघा हरुनि सुखी करिसी त्यांजला ।
निजपद त्या देऊनिया हरिसी भ्रांतिला ।
देसी भक्तजनां हे दयाघना ॥०१॥

जयजयाजी विघ्नांतक हे गजानना ।
पंचारति करितो तुज विश्वपालना ॥

दास विनवि निशिदिनी तुज गौरीनंदना
सुप्रसन्न होऊनि दे भजनिं वासना ।
सत्कीर्तिदायक ही बुद्धि या दीना ।
विठ्ठलसुत मागतसे पुरवि कामना ॥०२॥

दीनदयाळा गणपति

दीनदयाळा गणपति स्वामी द्यावी मज भेटी ।
तव चरणांची सखया मजला आवडी मोठी ॥

कवण अपराध म्हणवुनि देवा केला रूसवा ।
अहर्निशी मी हृदयीं तुझ्या करितसे धावा ॥०१॥

चिंताकूपी पडलों कोण काढील बाहेरी ।
धावे पावें सखया करूणा करूनि उद्धरी ॥०२॥

ऐसें होतें चित्ती तरी कां प्रथमचि देवा ।
अंगीकार करूनि केला कृपेचा ठेवा ॥०३॥

आता करणे त्याग तरीही स्वामी अघटित ।
शरण आलों माझा आतां चुकवी अनर्थ ॥०४॥

यादवसुत हा विनवी दोन्ही जोडुनियां कर ।
तव चरणांचा सखया मजला आहे आधार ॥०५॥

दीनदयाळा गणपति स्वामी द्यावी मज भेटी ।
तव चरणांची सखया मजला आवडी मोठी ॥

प्रेमगंगाजळें देवा

प्रेमगंगाजळें देवा न्हाणियेलें तुजला ।
सुगंध द्रव्यें मर्दन करूनी हतू पुरविला ॥

गंगाजळें रौप्याची त्यात की भरिलें जळाला ।
सुवर्णाचा कलश आणुनी हाती तो दिधला ॥

अंग मर्दितां हस्तें मजला उल्हासचि झाला ।
स्नान घालुनि वंदियेलें मी तुझिया चरणाला ॥

चरण क्षाळुनि प्राशियेले म्यां त्याही तीर्थाला ।
वाटे सात पिढ्यांचा मजला उद्धारचि झाला ॥

अंग स्वच्छ करूनी तुजला पीतांबर दिधला ।
अति सन्मानें सिंहासने म्यां तुजला स्थापियला ॥

भक्त सदाशिवतनय सदा लागत तव चरणीं ।
सर्वस्वहि त्यागुनि झाला निश्चय तव भजनी ॥

मंगलदायक सिद्धिविनायका

मंगलदायक सिद्धिविनायका आरती ही तुजला ।
करितों भावें दुर्वापुष्पे वाहुनी चरणाला ॥

कार्यारंभी पूजन तुझें सकल जन करिती ।
इच्छा पुरवूनी सकलां देसी सुखशांती सुमती ॥०१॥

सिंदुरखल मातुनी जेव्हां उपद्रव केला ।
भक्तरक्षणासाठी धावुनी सिंदुरखल वधिला ॥०२॥

ऐसा अगाध महिमा तुझा परम अपार ।
वर्णावया शेषाही थकला सुरवर ।॥०३॥

दीनदास मी तुझ्या प्रसादा । तिष्ठेतसे दारी ।
प्रसन्न होऊनी निजदासाला संसारी तारी ॥०४॥

मंगलदायक सिद्धिविनायका आरती ही तुजला ।
करितों भावें दुर्वापुष्पे वाहुनी चरणाला ॥

वक्रतुंड एकदंत गौरिनंदना

वक्रतुंड एकदंत गौरिनंदना ।
आरती मी करितों तुज हे गजानन ॥

पाशांकुश शोभे करी दु:खभंजना ।
रत्नजडीत सिंहासन बुद्धिदीपना ॥
सुरनरमुनि स्मरती तुला येति दर्शना ॥०१॥

वक्रतुंड एकदंत गौरिनंदना ।
आरती मी करितों तुज हे गजानन ॥

रिद्धिसिद्धि करीती सदा नृत्यगायना ।
देसि मुक्ति भक्तजनां हे दयाघना ॥
विठ्ठलसुत लीन पदीं विघ्ननाशना । वक्रतुंड एकदंत ॥०२॥

वेदशास्त्रांमाजीं तूं मंगळमूर्ती

वेदशास्त्रांमाजीं तूं मंगळमूर्ती ।
अगणित महिमा तूझा कल्याणस्फूर्ती ॥
भक्तांलागीं देसी विद्या अभिमत ती ।
मोरेश्वर नाम तुझें प्रसिद्ध या जगतीं ॥०१॥

जय देव जय देव जय मोरेश्वरा ।
तूझा नकळे पार शेषा फणिवरा ॥

पुळ्यामध्यें नांदे महागणपती ।
माघचतुर्थीला जन यात्रे येती ॥
जें जें इच्छिति तें तें सर्वहि पावती ।
गणराजा मज बाळा द्यावी अभिमती ॥०२॥

जय देव जय देव जय मोरेश्वरा ।
तूझा नकळे पार शेषा फणिवरा ॥

एकविस दुर्वांकुरां नित्य नेमेंसीं ।
आणुनि जे अर्पिती गणराजयासी ॥
त्यांचें तूं भवबंधन देवा चुकवीसी ।
विठ्ठलसुत हा ध्यातो तुझिया चरणींसी ॥०३॥

जय देव जय देव जय मोरेश्वरा ।
तूझा नकळे पार शेषा फणिवरा ॥

शिवकुमारा प्रणतवत्सला

जय जय जी शिवकुमारा प्रणतवत्सला ।
ओवाळीन पंचारति देई सुमतिला ॥

लंबोदर वक्रतुंड किती ।
मोरमुकुट वैजयंती कंठी झळकती ॥
कनकवलय तोडर ते बहुत विलसती ।
होतो बहु तोष मनीं पाहुनी तुला ॥०१॥

जय जय जी शिवकुमारा प्रणतवत्सला ।
ओवाळीन पंचारति देई सुमतिला ॥

त्वत्स्वरूप त्वदगुण हे स्वांति आणुनी ।
ओंवाळीन पंचारती लुब्ध होऊनि ॥
विनवितसे दत्तात्रय लीन भाषणी ।
भवतरणा अघ वारूनि उद्धरी मला ॥०२॥

जय जय जी शिवकुमारा प्रणतवत्सला ।
ओवाळीन पंचारति देई सुमतिला ॥

Ganpati Arati Sangrah PDF

Sharing Is Caring:

Leave a Comment