Kakad Aarti : काकड आरती मराठी (संग्रह)

काकड आरती आरती 1

उठा उठा हो साधक
साधा आपुलालें हित।
गेला गेला हा नरदेह,
मग कैंचा भगवंत।।1।।

उठा उठा हो वेगेंसीं
चला जाऊं राऊळासी।
हरतिल पातकांच्या राशी,
कांकड आरती पाहोनी।।धृ।।

उठोनियां हो पाहाटें
पाहा विठ्ठल उभा विटे।
चरण तयाचे गोमटे,
अमृतदृष्टीं अवलोका।।2।।

जागें करा रुक्मिणीवरा
देव आहे निजसुरा।
देगें निंबलोण करा,
दृष्ट होईल तयासी।।3।।

पुढें वाजंत्री
ढोल दमामे गर्जती।
होत कांकड आरती,
माझ्या पंढरीरायाची।।4।।

सिंहनाद शंख भेरी
गजर होतो महाद्वारीं।
केशवराज विटेवरी,
नामा चरण वंदितो।।5।।


काकड आरती भाग 2

कांकड आरती परमात्मया रघुपती
जीवीं जीवा ओंवाळिन निजीं निजात्मज्योति ॥धृ॥

त्रिगुणकांकडा द्वैतघृतें तिंबिला,
उजळली आत्मज्योति तेणें प्रकाश फांकला ॥१॥

काजळी ना दीप, अवघें तेज डळमळ,
अवनी ना अंबर, अवघा निगूढ निश्चळ ॥२॥

उदय ना अस्त जेथें, बोध प्रातःकाळी,
रामी रामदास सहजीं सहज ओंवाळी ॥३॥


काकड आरती भाग 3

हाटाचे तातडी दामा शिंपी गेला,
नैवेद्य पाठविला नाम्यासंगे।

नैवेद्य घेऊनि राऊळासि गेला,
हाका मारी त्याला, ‘विठ्या’ ‘विठ्या’।

नाम्याने नैवेद्य कुंचीखाली झाकिला,
आणुनी ठेविला देवापुढे।

नाही अमंगळ, नाही हो ओंगळ,
केली मी आंघोळ चंद्रभागे।

ऊठ झडकरी जेवी लवकरी,
माता माझी घरी वाट पाहे।

नेणता म्हणोनी का रे जेविनासी,
करीन प्राणासी घात माझ्या।

पाषाणाची मूर्ती कापे थराथरा,
जेवी भराभरा नाम्यासंगे।

पाषाणाची मूर्ती नाम्यासंगे जेविली,
जगी कीर्ती झाली जनी म्हणे।

नामा म्हणे माझी वडिलांची ठेव,
उभा आहे देव विटेवरी।


काकड आरती भाग 4

भक्तीचिये पोटीं बोध-कंकडा ज्योती
पंचप्राण जीवेंभावे ओंवाळूं आरती ॥१॥

ओंवाळूं आरती माझ्या पंढरीनाथा,
दोन्ही कर जोडूनि चरणी ठेविला माथा ॥धृ॥

काय महिमा वर्णू आतां सांगणें तें किती,
कोटी ब्रह्महत्या मुख पाहतां जाती ॥२॥

राई रखुमाबाई उभ्या दोन्ही दों बाहीं,
मयूरपिच्छचामारें ढाळिती ठईंच्या ठाईं ॥३॥

विटेसहित पाय म्हणुनी भावे ओंवाळूं,
कोटी रवी-शशी दिव्य उगवले हेळूं ॥४॥

तुका म्हणे दिप घेउनी उन्मनींत शोभा,
विटेवरी उभा दिसे लावण्यगाभा ॥५॥


काकड आरती भाग 5

उठा पांडुरंगा आतां दर्शन द्या सकळां
झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा ॥१॥

संत साधु मुनि अवधे झालेती गोळा,
सोडा शेजमुख आतां पाहूं द्या मुखकमळा ॥२॥

रंगमंडपीं महाद्वारीं झालीसे दाटी,
मन उतावेळ रुप पाहावया दृष्टीं ॥३॥

राई रखुमाबाई तुम्हां येऊ द्या दया,
सेजें हालवुनी जागें करा देवराया ॥४॥

गरुड हनुमंत उभे पाहाती वाट,
स्वर्गींचे सुरवर घेउनी आले बोभाट ॥५॥

झालें मुक्तद्वार लाभ झाला रोकडा।


काकड आरती भाग 6

श्रीगुरुदत्ता कांकड आरती ओवाळित आतां
तुजला ओवाळित आतां, भावें ओवाळित आतां,
निद्रातीत जागृत असतां न येचि उठवितां ॥धृ॥

माया वस्त्रांतुनि हे चिंधी सांपडली मजला,
नरतनु सांपउली मजला, अवचित सांपडली मजला,
वाया न जाऊं द्यावी म्हणुनी काकडा केला ॥१॥

विद्या अविद्या द्वैत उठतां त्रिपुटी उद्‌भवली,
मायिक त्रिपुटी उद्‌भवली,
सद्वस्तूचें स्मरणहि नसतां पीळ पडुनि गेली ॥२॥

मोहरुपें स्नेंहांत बुडवुनि ज्योती लावियली,
स्वयंज्योती लावियली, परंज्योती लावियली,
पाहुनि सद्‌गुरु बाबा राम म्हणे निशा सरली ॥३॥


काकड आरती भाग 7

पंचप्राण काकड आरती तत्त्वात्मक ज्योती
लावुनि तत्त्वात्मक ज्योती,
ओवाळिला श्री त्रयमूर्तिं परमात्मा प्रीती ॥ध्रु०॥

ओवाळूं आरती माझ्या सद्‌गुरुनाथा,
स्वामी श्रीगुरुनाथा।
शरण मी आलो तुज,
शरण मी आलो तुज,
श्री पदीं ठेवियला माथा ॥१॥

कृष्णा सुपंचगंगा अनादि संगमीं,
राहे यतिवर तरुतळीं।
तो हा माझा कुलस्वामी,
ओवाळूं० ॥२॥

द्वारीं चौघडा वाजे वाजंत्री वाजती,
कर्णे वाजंत्री वाजती।
नाना घोषें गर्जत,
नाना वाद्यें गर्जत,
भक्त स्वानंदें स्तविती ॥ओवाळूं ॥३॥

इंद्रादि सुरवर पन्नग दर्शनास येती,
श्रीचे दर्शनास येती।
नारद मुनिवर किंन्नर तुंबर आळविती ॥ओवाळूं ॥४॥

पाहुनि सिंहासनीं आदि मूर्ति सांवळी,
चिन्मय मूर्ति सांवळी।
श्रीगुरुभक्त तन्मय,
श्रीगुरुभक्त निर्भय
श्रीपदीं ओवाळी ॥ओवाळूं ॥५॥


काकड आरती भाग 8

काकड आरती स्वामी श्रीगुरुदत्ता
सद‌भावें ओवाळूं चिन्मयरुप अवधूता ॥ध्रु०॥

प्राणापान समान व्यान उदान मिलाले,
सुषुम्णेचे मार्गें दर्शनासि पातले ॥१॥

सोऽहं शब्दध्वनि मिळोनि सर्वांनी केला,
दशनादाचा घोष अखंडित चालिला ॥२॥

कुंडलिनीचा वेढा काढुनि काकडा केला,
सत्रावीचें धृत घेउनी पूर्ण भिजवीला ॥३॥

सद्‌गुरु वाक्याचा चिन्मय प्रकाश पडला,
निश्चय काकडा नेऊनि तेथें पेटविला ॥४॥

निरंजन ओवाळूं जातां तद्रूप झाला,
सद्‌गुरुप्रसादें अहंभाव निमाला ॥५॥


काकड आरती भाग 9

काकडे आरती दत्ता तुजला ओवाळूं
प्रेमभावें तुझे चरण हृदयीं कवळूं ॥ध्रु०॥

माया अविद्या एकत्र वळुनी काकडा केला,
स्वरुपानुस्मरणें स्नेहामाजी भिजवीला ॥१॥

विवेकज्ञानाग्नि ज्वाळेवरि सहसा पाजळिला,
पेटुनियां झगझगीत उजेड हा पडला ॥२॥

द्वैत ध्वांता समूळ ग्रासुनि मनोन्मनी शोभा,
फांकली तेव्हां पळत सुटे कामादिक शलभा ॥३॥

धावुनि आपोआप येती कामादिक शलभ,
जळती ज्यांचा अंत योगियां दुर्लभ ॥४॥

काकडे आरती ऐशी उजलूं सोज्वळ।


Get Full List

Sharing Is Caring:

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
Best Wordpress Adblock Detecting Plugin | CHP Adblock