86+ Swami Samarth Vichar | श्री स्वामी समर्थ विचार

श्री स्वामी समर्थ विचार (Swami Samarth Vichar)

आपल्या आयुष्यात उच्चतम आदर्श, स्पर्श करणाऱ्या उपलब्धतेचा प्रतिबिंब असावा तर स्वामी समर्थ यांच्या अनमोल विचारांमुळे होतो. त्यांनी आपल्या जीवनाला नवीन दिशा दिली आणि सर्व संदेशांना प्रेरणा दिली. श्री स्वामी समर्थांच्या विचारांमध्ये संदेश आहे की, जीवनातील कोणत्याही समस्या आणि आधीच्या स्थितीत असलेल्या कोणत्याही उधारणा दुर करण्याचे उपाय आपल्या आपल्या आत्मविश्वासात आहे.

त्यांच्या उपदेशांनी आपल्या जीवनात नवीन आणि शक्तिशाली परिणाम घेऊ शकता. या लेखात, आपल्याला ‘श्री स्वामी समर्थ विचार (Swami Samarth Vichar)’ यांच्यावर ओळखण्यासाठी 85+ विचारांचे एका संग्रहाचे संपूर्ण वर्णन दिले गेले आहे.

1. उगाची भितोसी भय हे पळू दे
जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे
जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा

2. तुम्हाला वाटते तेवढे जीवन कठीण नाही, तुमच्या निस्वार्थ धर्म कर्तव्याने ते सहज शक्य आहे.

3. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरीही मी सदैव तुमच्या पाठिशी राहीन – श्री स्वामी समर्थ

4. विभूती नमन नाम ध्यानादी तिर्थ स्वमीच या पंच प्राणाभृतात
हे तिर्थ घे, आठवी रे प्रचिती न सोडेल स्वामी ज्या घेई हाती

5. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही.

6. आपला वेळ स्वतःला घडविण्यात खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांचा दोष पाहायला वेळ मिळणार नाही.

7. जाणीव ठेव शुद्ध मनासी काय व्यर्थ बरळतो,
कशाची असो भूक त्यासी? तू पुढे काय ठेवितो

8. अस म्हणतात की, काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं.

9. नियत कितीही चांगली असुद्या ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते आणि आपला दिखावा कितीही चांगला असुद्या परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो.

10. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे

श्री स्वामी समर्थ के विचार (Swami Samarth Vichar)

11. जो असे कारण सर्व सृष्टीशी, अकारणे जो लावी भक्तीसी
भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी, असा अविनाशी स्वामी माझा

श्री स्वामी समर्थ विचार (Swami Samarth Vichar) -जो असे कारण सर्व सृष्टीशी

12. विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी,
तिथून साथ देतो मी

13. दुसऱ्याच्या ताटातले हिसकवून घेण्यात शान नाही तर कोणाला आपल्या ताटातले देण्यात आहे खरे समाधान ही नियती आहे की, ही आहे की हिसकावून घेणारा कधी सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधी दुखी होत नाही.

14. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही
या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही
जी झुंझ तू खेळतो आहेस मनासी
त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी.
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.

15. एक भास एक विसावा नित्य स्वामी दिसावा स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा, हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा.

16. बाळा, मला तुझी काळजीच नाही तर प्रेम आहे म्हणून तुला मार्ग दाखवण्यात सदैव तयार असतो…फक्त एकदाच हाक मार.

17. ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे,
निष्काम कर्म करावे

18. मोठा अधिकार, संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये

19. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात.
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल

20. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय
दुसऱ्याचं भलं झालेले पाहण्याची ताकद
आपल्या मनात असली पाहिजे

स्वामी समर्थ द्वारा प्रेरित विचार(Swami Samarth Vichar)

21. तू कोणाला फसवू नकोस
मी आहे तुझ्या पाठीशी
तुझी फसवणूक होऊ देणार नाही

तू कोणाला फसवू नकोस
मी आहे तुझ्या पाठीशी
तुझी फसवणूक होऊ देणार नाही

22. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही
आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही

23. प्राण गेला तरीही दुसर्‍या जीवाची हिंसा करू नये

24. मितभाषी असतो सदा सुखी व्यर्थ बोलेल तो होईल दुखी, पण समर्थ नाम रोज स्मरावे त्यास कधी न विसरावे मनुष्य जन्म मिळतो एकदा स्वामी नामात आनंद सर्वदा.

25. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास अहंकाराचा करावा. कधी उपवास मीपणाचा करावा.

26. माझे सच्चे भक्त कधी कोणाला दुखावत नाहीत कारण त्यांना माहीत आहे की समोरही स्वामीच आहेत.

27. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो,
पण जर आत्मविश्वास असेल
तर अशक्य असे काहीच नाही

28. अशक्य ही शक्य करतील स्वामी

29. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका
पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली
त्यांचे मोल कधी विसरू नका

30. स्वामी म्हणतात, जी माणसं आयुष्यात तुमच्या सोबत नसतात ती माणसं नक्कीच तुमच्या मनात असतात.

31. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठिशी आहे

32. शुद्ध अंतःकरण ठेऊन नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते. मग तळमळही आपोआप जाते.

33. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही.

34. देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत.
ते अडचणींना सांगी की तुमचा देव किती मोठा आहे

35. जेथे नाम आहे तिथे मी आहे.

36. नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय

37. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे – पुढे चालतो

38. शोधणार असशील तर काळजी करणारा शोध कारण तुझा वापर करणारे तुलाच शोधात तुझ्यापाशी येतील.

39. जो नुसता नामात राहील त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन

स्वामी समर्थ के आदर्श विचार (Swami Samarth Vichar)

40. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता
अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य
आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी

41. संकटांना कधी कंटाळायचं नसतं त्यांना सामोरं जायचं असतं

42. माणूस असुदे, प्राणी असुदे…ठेव समानतेचे भान एवढे लक्षात ठेव तेथे ही स्वामी आहे हे जाण.

43. कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं,
आपण आपलं चांगलं काम करायचं असतं

44. तुला भीती वाटत असेल, मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल, तर डोळे बंद करून माझे नामस्मरण कर, अशाने तू माझ्याशी संवाद साधशील.

45. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही

46. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा?
कधी कधी वाईट विचारांचाही करावा.
कधीतरी उपवास अहंकाराचा करावा,
कधी उपवास मीपणाचाही करावा

47. विचारांवर लक्ष ठेवा, त्याचे शब्द होतात आणि शब्दांवर लक्ष ठेवा त्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा त्या सबबी बनतात, सबबींवर लक्ष ठेवा त्यातून चरित्र घडते, चारित्र्यावर लक्ष ठेवा ते आपले भविष्य घडविते.

48. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही.
या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही

49. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत राहणार आहे मी

श्री स्वामी समर्थ विचार (Swami Samarth Vichar) - समाधानी राहा सुखी व्हाल

50. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येते

51. योग्य माणसाकडून मिळालेला सल्ला हा लाखमोलाचा असतो आणि चुकीच्या माणसाकडून मिळालेली लाख मोलाची गोष्ट ही कवडीमोल असते.

स्वामी समर्थ के सुविचार (Swami Samarth Vichar)

52. समाधानी राहा सुखी व्हाल
भक्ती करा मुक्ती मिळेल
ध्यान करा ज्ञान मिळेल
प्रार्थना करा प्रगती होईल

53. मीपणा सोडा मोठे व्हाल
सहाय्य करा सोबत मिळेल
दान करा धन मिळेल
त्याग करा आत्मानंद मिळेल
श्रम करा सुख मिळेल

54. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ

55. नाशवंत हा देह उद्या नाहीसा होईल काय कमवले आणि काय जमवले कधीतरी मातीमोल होईल…दोन शब्द घे मुखी, प्रेमाने जग जिंक…मग होशील तू आणि इतर सुखी

56. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो

57. निःशंक हो, निर्भय हो, प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना। अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी

58. कृपापूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरलेले, भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसुसलेले
चेहऱ्यावरचं तेज पाहून भान हरपते, स्वामीचरणी मन सहज दृढ होते

59. क्षणोक्षणी वाटे स्वामी नामाचा आधार, स्वामी संग धरता कोण राहील निराधार

60. ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ

61. दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते.
तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते

62. विश्वास ठेव…
अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही

63. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत हे जितकं शक्य आहे तितकंच सत्य हे ही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही

64. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका. पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका.

स्वामी समर्थ के गहरे विचार (Swami Samarth Vichar)

65. बंद केले नयन माझे चित्त रूप बघूनी तुझे
स्वामी तिन्ही जगाचा तू माय बाप आहे या जनाचा

66. जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव
म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव

67. गरीबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाम कधीच फुकट जात नाही

68. सुखच हवे असा अट्टाहास करू नकोस, कारण प्रत्येक परिस्थिती मध्ये सुख हे लपलेलेच आहे; जसे दुधात दही लपलेले असते, तसेच तुझ्या कर्माच्या रवीने लपलेले सुख बाहेर येईल.

69. नामस्मरण करताना संसार किंवा कुठल्याही कर्माचा त्याग करण्याची गरज नाही, तर तेच कर्म दिव्या करण्यासाठी, नामाचा आश्रय घे.

70. अरे बाळा, उदास असशील तर माझे नाव घे, दुखी असशील तर माझे नाव घे, मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे, एवढ्याने समाधानी नसशील तर बाळ अक्कलकोटची वाट घे.

71. ज्या वेळी तू जाशील काळोखात, त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ
तू घाबरू नकोस, स्वामीच पकडतील तुझा हात

72. तुम्ही कितीही चांगले शब्द वाचा, कितीही चांगले शब्द ऐका किंवा कितीही चांगले शब्द बोला पण ते शब्द जोपर्यंत तुमचे भलं करत नाही जोपर्यंत तुम्ही ते चांगले शब्द आचरणात आणत नाही.

73. तुझ्या आंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही, या कलीयुगात तुला एकटे सोडणार नाही, जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी.

74. अरे बाळा, काय तुझा आमच्यावर विश्वास नाही? मग एकटाच झुरत बसण्यापेक्षा मला हाक मारायची मी आहे ना तुझ्या पाठीशी.

75. ज्याप्रमाणे सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो, त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा लोकच तुमचा परिचय देतील.

76. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवलं त्या दिवशी आपोआपच मार्ग निघेल.

77. तुला जर असे वाटत असेल की कशाला उगाच स्वामींना त्रास द्यायचा आपले दुःख सांगून? तर खरा त्रास तू आता देत आहेस, मला काहीच न सांगून.

78. जीवनात कोणतेही वळण आले तरी स्थिर राहा, कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल.

स्वामी समर्थ के सुविचार (Swami Samarth Vichar)

79. विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असशील तर, मागे हेतू नकोस, ठाम राहा आणि ते कृतीत उतरवं.

श्री स्वामी समर्थ विचार (Swami Samarth Vichar) - विवेक बुद्धीने विचार करुन

80. कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मला सांग; माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे आहे, त्यापर्यंत नक्की पोहचेल.

81. सुखासाठी कुणापुढे हात पसरू नका वेळ जाईल, त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा चांगली वेळ निश्चित येईल.

82. निस्वार्थ कर्म हाच एक धर्म बाकी मनाचा पसारा, कर्म करता करता नाम घेत जा…मग ना उरे मन आणि नाही पसारा.

83. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाऊन्स होणार नाही.

84. मी माझ्या भक्तांना पाठबळ सतत देत असतो, ज्यांनी मला जाणले त्यांना हे कळले आणि ज्यांना नाही कळले, त्यांनी मलाच आपणहून गमावले.

85. तु तुझ्या स्वामींना नाही तर तुझ्या स्वामींनी तुला निवडले आहे नि:शंक राहा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.

86. स्वामी म्हणतात, चूक महत्वाची असेल तर व्यक्ती विसरावी आणि व्यक्ती महत्वाची असेल तर चूक विसरावी.


इसे पढ़े

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
Best Wordpress Adblock Detecting Plugin | CHP Adblock